लुपस माझा साथी

पेशंट कोण आहे तुमच्यापैकी ? माझ्याकडे बोट दाखवले मुळीच वाटत नाही ! कारण, मला सवोत्तम डॉक्टर मिळाले, माझ्या घरच्यांनी मला खूप समजून घेतले आणि मी स्वतः जिद्द सोडली नाही लंडनच्या लुपस सोसायटी मधला हा संसार सुमारे १० वर्षां पूर्वीचा साधारणतः २००७ मध्ये मला सांधेदुखी सुरु झाली त्या पाठोपाठ केस गळणे, प्रचंड थकवा, निरुत्साह, दम लागणे या गोष्टीही बाहेर जाताना उन्हाचा चटका बसायचा. घरी मला इंदुमती (अज राजाची नाजूक पत्नी, जिला ७ परांच्या गादयाखालचा केस टोचायचा) म्हणायचे. थांब तुझा आजार हा लुपस असावा असे माझ्या डॉक्टर बिचिली म्हणाल्या. आपण सर्व चाचण्या करून घेऊया डॉक्टर बिचिली, सर्व प्रकारच्या चाचण्यांनी निदान बरोबर ठरवले, मग खरा औषधोपचार सुरु झाला.

 

लुपस हा अनेक अवयवांवर एकाच वेळी परिणाम करतो, तुमची प्रतिकारशक्तीच तुमच्या शरीराविरुद्ध काम करते म्हणून ह्याला मल्टिपल ऑर्गन फैलयुअर अशा प्रकारचा आजार म्हणतात. बहुतांशी हा आजार स्त्रीयांना होतो. स्टिरॉइड हा मुख्य गाभा त्याच्या जोडीला इम्युनो स्प्रेसटंट्स व नंतर इतर होणाऱ्या आजारांप्रमाणे विविध इलाज. बीपी, मधुमेह, सांधेदुखी, किडनी आणि मसल्स चे आजार या प्रमाणे औषधोपचार, त्याचे परिणाम होतात कि नाही या साठी सातत्याने चाचण्या, एकेकाळी मी सुमारे २६ गोळ्या दिवसाला घेत असे. अगदी वेळ लावून (घड्याळाची) कधी हि गोळ्या चुकवल्या नाहीत प्रवासात सुद्धा स्वतः ची पाण्याची बाटली आणि गोळ्यांची डबी सोबत घेऊन फिरत होते. खूप फिरले – भारतात आणि भारताबाहेरही नोकरी चालूच त्यात प्रगतीही झाली!

 

प्रकृतीत चढउतार होत असत पण डॉक्टरांचा नियमित सल्ला व त्या प्रमाणे औषधे हा नियम ठरवला होता डॉक्टर बदलले नाहीत त्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांच्यावरच श्रध्दा ठेवली. सर्व औषधोपचार का? इतक्या गोळ्या कशासाठी हे सारे समजून घेतले वेळोवेळी त्यांच्याशी चर्चा केली (वादही घातले) पण डॉक्टर बदलले नाहीत रुग्णाचा इतिहास, घरच्यांची माहिती, त्याची मूळ प्रकृती आणि त्यानुसार औषधोपचार हे अत्यंत महत्वाचे ह्या सर्वांमुळे माझे वैद्यकीय ज्ञान वाढले नक्कीच. लुपस बद्दलची खालील वाक्य आपल्याला हा आजार छुपा आहे, फसवणारा हे पटवून देतात

 

“Because you look well, nobody understands the way you are feeling.”
किंवा
“It’s the tiredness. Even if you could sleep all day and all night, it wouldn’t help.”

 

आता मला लुपस समजायला लागला आहे. ह्या आजारात चढउतार असतात त्याच्यासाठी काही पुस्तके – मुख्यत्वे करून डॉ अंजली रानडे यांचे “लुपस चे महाभारत” किंवा श्रीकृष्ण मराठे यांचे “माझी आरोग्ययात्रा” हि पुस्तके आवर्जून वाचावीत.

-मृदुला देवस्थळे