नमस्कार ! ८ मार्च नुकताच साजरा झालेला International Women’s day !
स्त्रीच्या स्त्रीत्वाच्या, जाणिवांचा, हक्कांचा, समानतेचा आणि सन्मानाचा दिवस. स्त्रीच्या अस्तित्वालाच नव्हे तर तिच्या कर्तुत्वाला सलाम करायचा दिवस! एक मुलगी, बहीण, मैत्रीण, बायको, आई, आजी, अशा किती भूमिका साकारते स्त्री. एकविसाव्या शतकात तर घर कुटुंबा पलीकडे जाऊन देश रक्षणाकरता फायटर पायलट होते, चंद्र मंगळाची अवकाश भरारी घेते आणि कोविड सारख्या महामारीत डॉक्टर, नर्स, स्वच्छता कर्मचारी आणि पोलीस बनून कोविड योद्धाही होते.
स्त्रीला निर्माण करताना निसर्गाने थोडं झुकतं माप दिलं. मातृत्वाची अनमोल अद्भुत देणगी देताना निसर्गानं वेदना आणि सहनशक्ती ही दिली पण दुर्दैवानं या सहनशक्तीची परीक्षा बघणाऱ्या संधिवातासारख्या दुर्धर आजारांचे झुकते मापही स्त्रीच्या पदरी पडले.
संधिवात अनेक प्रकारचे आमवात, कॉलेजन डिसेअसेस, लुपस हे मात्र मुख्यत्वे स्त्रियांमध्ये दिसणारे कधीही पूर्ण बरे न होणारे किचकट संधिवात. स्त्रीच्या शरीरालाच नव्हे तर मन, बुद्धी, विचार सर्वाना ग्रासणारे म्हणूनच स्त्री पुरते न राहता तिच्या घरातले नातेसंबंधही कुरतडणारे. होय मैत्रिणींनो संधिवात कुणा एकीची व्यथा नसून तो एक सामाजिक प्रश्न (social problem) आहे. शरीराच्या वेदना, औषध उपचार त्याचे दुष्परीणाम, सततचे फॉलोअप तपासण्या आणि या सर्वातून येणाऱ्या आर्थिक अडचणी, थकवा, उदासीनता आणि नैराश्य ही सारी आव्हाने सांधधवाताच्या स्री पेशांट समोर उभी राहतात. Choose to challenge ही यावर्षीची Women’s day ची संकल्पना संधिवाताच्या स्त्रियांकरिता खूपच समर्पक आहे.
संधिवाता बद्दल जनसामान्यात असलेले अज्ञान आणि गैरसमजुतीमुळे अशा स्री रुग्णांची लग्न ठरताना अनेक अडचणी येतात. संधिवाता बद्दल खरी माहीती द्यावी तर लग्न मोडली म्हणून समजा, लपवून ठेवावां तर कधी ना कधी लगनानांतर ही गोष्ट उघड होते आणि मग फसविूक भाांडिे कधीकधी घटस्फोटापयांत गाडी जाते. लगनानांतर संधिवात झालेला असेल तर गरोदर न राहणे किंवा वारंवार गर्भपात , सासरच्या मंडळींचा रोष, वैवाहीक संबंधांवर ताण , गरोदरपणा आणि प्रसुतीतले धोके अश्या अडचणींचे डोंगर संपतच नाही.
यातून काहीच मार्ग नाही का?
इच्छा तेथे मार्ग आहे. मैत्रिणींनो संधिवात आजार ही तुमची ओळख नव्हे तर या संधिवाताला स्वीकारुन जगण्याची उमेद आणि त्याच्याशी सामना करण्याचे धैर्य ही तुमची ओळख आहे. म्हणूनच खचून जाऊ नका , स्वतहाचा आत्मविश्वास दृढ करा, स्वप्न बघा ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करा, लढा तुमच्या आत मधल्या प्रचंड धैर्याला जागं करा. सांधीवाताबद्दलचे गैरसमज शांका तज्ञाांकडून दुर करून घ्या, आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हा आणि मग बघा प्रत्येक स्रीच्या आतदडलेली ती आदिशकती, लक्ष्मी, सरस्वती आणि काली सुद्धा जागी होऊन संधिवात रूपी अज्ञानरूपी राक्षसाचा संहार करेल.
मैत्रिणींनो सर्व संधिवात नियंत्रित होऊ शकतात. संधिवाता बद्दलचे गैरसमज दूर करा. तज्ञाांच्या मार्गदशनाखाली नियमित औषधोपचार घ्या. संतुलित आहार आणि योग्य व्यायाम करा. साांध्याांचे कार्य आणि आरोग्य चांगले ठेवा! संधिवाताच्या सर्व स्री पेशंट फाइटर्सना माझ्या खूप खूप शुभेच्छा! आणि समस्त भाऊ, पती, मित्र आणि मुलाांना आवाहन– साथ द्या ‘ती’ ची , एक प्रेमाची फुंकर घाला आणि विश्वासाचा हात पाठीवर ठेवून ‘फक्त लढ म्हणा ‘!!
– डॉ वैजयंती लागू जोशी , संधिवात तज्ज्ञ पुणे